Slide 5
Slide 4
Slide 3
Slide 2
Slide 1
ताजी बातमी

भारतीय समाज हा नेहमीच ज्ञानाचा भक्त आहे. या देशात, गुरुकुल प्रणालीद्वारे शिक्षण घेण्याची आदर्श पद्धत विकसित केली गेली. शिक्षणाच्या मदतीने समाज सुशिक्षित आणि सुव्यवस्थित होतो. या प्रकारचा समाज देशाला एका सशक्त राष्ट्राच्या रूपात घालत आहे. नवीन पिढी तयार करण्यासाठी शाळा आणि शिक्षकांमध्ये अशा प्रकारची क्षमता असणे खूप आवश्यक आहे.

“आर्य चाणक्य विद्याधाम” : मूळ संकल्पना

भारतीय समाज नेहमीच ज्ञानाचा उपासक राहिला आहे. याच देशात गुरुकुल पद्धतीने शिक्षण घेण्याची आदर्श परंपरा विकसित झाली. शिक्षणाने समाज सुसंस्कारित होतो व असाच समाज एका बलशाली राष्ट्राचा आकार घेतो. अशी नवीन पिढी घडविण्याचे सामर्थ्य शाळा व शिक्षकांत असणे अत्यंत आवश्यक आहे.

आजची शैक्षणिक दुरवस्था पाहता या देशाला पुन्हा आपले गतवैभव प्राप्त करून देण्यासाठी एक आदर्श शैक्षणिक संकुल उभारावे असा विचार पुढे आला. ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक कै. मा. प्रल्हादजी अभ्यंकर यांच्या प्रेरणेने व मार्गदर्शनाने संघ विचाराने प्रेरित झालेल्या प्रतिष्ठित व्यक्तींनी सन 1997 मध्ये राजर्षी शाहू शिक्षण व ग्रामोद्योग या संस्थेची मुहूर्तमेढ रोवली. या संस्थेच्या अंतर्गत , समाजात चेतना निर्माण करणाऱ्या व चंद्रगुप्ता सारखा सम्राट घडवणाऱ्या थोर आचार्यांच्या नावे आर्य चाणक्य विद्याधाम या निवासी विद्यालयाची स्थापना संभाजीनगर( औरंगाबाद) येथे सन 1998 मध्ये करण्यात आली. शहरापासून 11 किलोमीटर अंतरावर दुर्गडी टेकडीच्या पायथ्याशी 30 एकरांचा निसर्गरम्य परिसर यासाठी निवडण्यात आला.पुढे वाचा

शाळा उपक्रम

शैक्षणिक सुविधा

शैक्षणिक सुविधा

‘उत्तम विद्यार्थी घडविणे’ हे ध्येय डोळ्यासमोर ठेवून अर्थपूर्ण , वैशिष्ट्यपूर्ण आणि परिणामकारक शिक्षण देणारी शिक्षण व्यवस्था अनेक वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. अधिक वाचा

खेळ सुविधा

खेळ सुविधा

" खेळ हा शालेय शिक्षणाचा अविभाज्य भाग आहे." संघभावना, संघर्ष, खिलाडूवृत्ती, सहकार्य, यशापयश स्वीकारण्याचा दृष्टीकोण, इत्यादी मूल्यांचा विकास खेळांच्या माध्यमातूनच चांगल्या प्रकारे होऊ शकतो. अधिक वाचा

निवासी सुविधा

निवासी सुविधा

वसतिगृह म्हणजे दुसरे घर, येथे विद्यार्थ्यांना आपुलकी, प्रेम, जिव्हाळा मिळावा व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने वसतिगृह खालील वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. अधिक वाचा

भोजन व्यवस्था

भोजन व्यवस्था

आपल्या शाळेतील भोजन विभाग हा विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. भोजनाचे नियोजन करताना मुलांचे आरोग्य सुदृढ शरीर या बाबी विचारात घेऊन चौरस व चविष्ट आहाराचे नियोजन केले जाते. अधिक वाचा

आर्य चाणक्य विद्याधाम

शाळेचा पत्ता : दुर्गाडी पारीसार, जाटवाडा, ता. व जि.
औरंगाबाद.
फोन : (0240) 6544621, 6453056

कार्यालय : देवगिरी नागरी सहकारी बँकेच्या वर, झांबड इस्टेट, न्यू श्रेया नगर, चेतना नगर, औरंगाबाद.
फोन : (0240) 2327466.
मोबाइल : 93716 79406 (मदन तसेवाल, जनसंपर्क अधिकारी )