अध्ययन- अध्यापन
शिकवण्याची पद्धत
अध्ययन-अध्यापन प्रक्रिया जीवंत व्हावी ती केवळ व्याख्यान पद्धत होवू नये यासाठी व्दिकेंद्री कृतीयुक्त अध्यापन पद्धतिचा वापर अध्यापक करतात. विद्यार्थी सहभाग वाढवा यासाठी विविध विद्यार्थी कृतींचे नियोजन केले जाते. गटचर्चा, संवाद, प्रश्नावली, नाट्याभिनय, प्रयोग, विद्यार्थी अध्यापक अशा विविध अध्यापन-अध्ययन कृतींचे नियोजन करून हसत-खेळत अध्यापन केले जाते. ज्यामुळे शिक्षण प्रक्रिया जीवंत होऊन व्दिध्रुवी होते.
आपले अध्यापन अधिक प्रभावी व्हावे यासाठी विषयानुरूप विविध शैक्षणिक साधनांचा वापर अध्यापनात केला जातो. अनेक शैक्षणिक साधने अध्यापक स्वत: निर्माण करून अध्यापनात उपयोग करतात. विद्याधामात शैक्षणिक साहित्य कक्ष उपलब्ध आहे.
आपले अध्यापन अधिक प्रभावी, विद्यार्थीकेंद्रित व्हावे यासाठी समुह (गट) अध्यापन पद्धतीचा अवलंब केला जातो. वर्गातील एकूण विद्यार्थ्यांची गट रचना बहुवर्ग, बहुश्रेणी पद्धतीने केली जाते. गटश: विविध अध्ययन-अध्यापन कृतींचे नियोजन करून अध्यापन केले जाते. गटश: नाट्यीकरण, कवितेस चाल लावणे, गटश: प्रश्नमंजुषा, गटचर्चा, गटाकडून अध्यापन अशा विविश अध्यापन कृतींचा अवलंब करून अध्यापन प्रभावी होईल यासाठी प्रयत्न केला जातो.
विद्याधामातील प्रत्येक वर्ग हा स्मार्ट (डिजिटल) क्लास असल्यामुळे दृक-श्र्व्य माध्यमातून अध्यापन केले जाते. विद्यार्थी स्वत: पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करतात. अध्यापक आपल्या विषयानुरूप स्वत: P.P.T. तयार करून दृक-श्राव्य माध्यमाद्वारे अध्यापन करतात.
शिक्षण प्रक्रिया व्दिध्रुवी व्हावी यासाठी विद्यार्थांचा अध्यापनात सहभाग घेतला जातो. विद्यार्थी स्वत: समोर येऊन सेमिनार देणे, अध्यापन करणे. P.P.T. इत्यादी माध्यमातून अध्यापनात सहभागी होतात. जेणे करून विषयाचे आकलन अधिक उत्तम होते.