भोजन विभाग

वेळआहार
सकाळी : ६.३० दूध, पेंडखजूर, कडधान्य.
सकाळी : ७.४५ नाश्ता: पोहे, उपमा, शिरा, मिसळ, बाजरी खिचडी
दुपार : १२.४५ भोजन: दोन भाज्या, चपाती, डाळ-भात, चटणी, कोशिंबीर, तूप, ताक.
दुपार : ४ .०० फलाहार - केळी, पपई, टरबूज इत्यादी.
रात्र : ७.३०भोजन - एक भाजी, डाळ-भात, चपाती, चटणी, कोशिंबीर, तूप.
प्रकारआहार
नियमित भाज्यावेगवेगळ्या फळभाज्या, वेगवेगळ्या पालेभाज्या आणि वेगवेगळे पारंपरिक पदार्थ जसे - आमटी-पातोडी, कढी-भजे, शेव-भाजी.
नियमित नाश्ताउपमा, पोहे, शिरा, सुशीला, चित्रान्न, मिसळ, साबुदाणा खिचडी, बाजरी खिचडी.
विशेष नाश्तामहिन्यातून दोनदा सामोसा / कचोरी, मिसळ-पाव, ढोकळा / इडली-सांबर, पराठा, भजे इत्यादी.
विशेष भोजनमहिन्यातून एकदा, पिठलं-भाकरी, पाव-भाजी, डाळ-बट्टी इत्यादी.
दूधसकाळी व रात्री गायीचे दूध दिले जाते. सकाळी दूधासोबत पेंडखजूर व मुठभर कडधान्य दिले जाते.

आपल्या शाळेतील भोजन विभाग हा विविध वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे. भोजनाचे नियोजन करताना मुलांचे आरोग्य सुदृढ शरीर या बाबी विचारात घेऊन चौरस व चविष्ट आहाराचे नियोजन केले जाते :-

नाश्ता :-

मुलांना दररोज सकाळी ७.४५ वाजता नाश्ता दिला जातो . आठवड्यात प्रत्येक दिवशी वेगळा नाश्ता असतो. नाश्त्यामध्ये उपमा, पोहे, शिरा, मिसळ, सुशिला, बाजरी खिचडी, ईडली सांबर, पराठे, चित्रान्न, वडा सांबर ढोकळा, दाबेली, सामोसा, साबुदाणा खिचडी, नुडल्स, दहीवडा इ. पदार्थांचा समावेश असतो.

भोजन :-

मुलांना दुपारच्या भोजनात दोन भाज्या, वरण, भात, पोळी, चटणी, सलाद/कोशिंबीर, तूप, ताक याप्रमाणे आहार दिला जातो . दुपारच्या भोजनामध्ये एक रस्सा भाजी असते तर दुसरी सुकी भाजी असते. आठवड्यातून दोन वेळेस पालेभाजी दिली जाते. रात्रीच्या भोजनात एक भाजी, पोळी, वरण, भात, चटणी, तूप याप्रमाणे आहार असतो, महिन्यातून बदल म्हणून कधी पिठल भाकरी, वरणफळ, पावभाजी, पराठे चटणी, खिचडी कढी, दाळबट्टी, रगडा पेटीस, भेळ इ. वेगळ्या प्रकारचे भोजन दिले जाते.

मिष्टान्न भोजन :-

महिन्यातून दोन वेळेस मिष्टान्न भोजन देण्यात येते. तसेच आपल्या भारतीय सणानुसार मिष्टान्न पदार्थचे नियोजन केले जाते. मिष्टान्नामध्ये जिलेबी, गुलाबजामून, इमरती, बालुशाही, पुरणपोळी, गाजर हलवा, श्रीखंड बासुंदी, मोतीचूर लाडू, बेसन बर्फी इ. प्रकारचे मिष्टान्न पदार्थ मुलांना दिले जातात.

भोजन प्रतिनिधी :-

आहाराचे नियोजन करण्यासाठी तसेच मुलांची आवड निवड समजावी त्यासाठी प्रत्येक वर्गाच्या दोन प्रतिनिधींची निवड केली जाते. मासिक आहार तक्ता तयार करण्यासाठी त्यांचे मत विचारात घेतले जाते.

किराणा, भाजी व फळे खरेदी :-

मुलांसाठी उच्च दर्जाचा किराणा माल खरेदी करण्यात येतो. प्रत्येक मालाची गुणवत्ता तपासून घेतली जाते. किराणा माला मध्ये तांदूळ-मदर इंडिया ब्रान्ड, डाळी – बजरंग ब्रान्ड सर्व किराणा माल निवडलेला असतो. तसेच भाजी व फळे यांची खरेदी आठवड्यातून दोन वेळेस केली जाते. यामध्ये प्रामुख्याने भाजी व फळे उत्तम गुणवत्ता असलेली खरेदी कएली जाते . प्रत्येक दिवशी वेगळ्या प्रकारचे फळ असते.

अन्न विभागाची मुख्य वैशिष्ट्ये :-
  • भारतीय शैलीमध्ये बसण्याची व्यवस्था,गटनिहाय बसण्याची व्यवस्था.
  • विस्तृत व्यवस्था / सेवा व्यवस्था.
  • समानता भोजन.
  • जेवतांना साजेसं शांत वातावरण.
  • चांगल्या दर्जाचं साहित्य.
  • स्वच्छता.
  • कमीतकमी अन्न नासाडी.
  • आहारतज्ञाचे मार्गदर्शन.