सुविधा
वसतिगृह सुविधा
वसतिगृह म्हणजे दुसरे घर, येथे विद्यार्थ्यांना आपुलकी, प्रेम, जिव्हाळा मिळावा व विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास व्हावा या हेतूने वसतिगृह खालील वैशिष्ट्यांनी परिपूर्ण आहे.
वसतिगृह प्रमुख, सहप्रमुख व त्यांना सहाय्यक १० पर्यवेक्षकांच्या द्वारे वसतिगृहाच्या विविध व्यवस्था केल्या जातात.

निवासी विद्यार्थ्यांची राहण्याची उत्तम सोय व्हावी या हेतूने वसतिगृहाची दोन मजली प्रशस्त वास्तू उभारली आहे. ही इमारत हवेशीर निवास कक्ष, दोन सभागृहे, व स्वच्छ प्रसाधनगृहे यांनी सुसज्ज आहे.

प्रत्येक निवासात कमाल ८ विद्यार्थ्यांची सोय केली जाते. प्रत्येक खोलीत वर्गश: मुलांची निवास व्यवस्था केलेली असते. प्रत्येक निवासी कक्षांना प्रेरणादायी व्यक्तीची नावे दिलेली आहेत.

प्रत्येक निवासात बंकबेड, गादी, बेडशीट, कपाट, फॅन, आरसा या वस्तू उपलब्ध असतात. तसेच निवासाबाहेर हँगर, बुटस्टँड यांची व्यवस्था असते. आठवडयातून एकदा बेडशीट बदलले जाते.

प्रत्येक मजल्यावर एक पर्यवेक्षक निवासकक्ष असतो. विद्यार्थ्यांची काळजी घेणारे, बालसंगोपन, खेळ, आरोग्य, योग या विषयांचें प्रशिक्षित १० पर्यवेक्षक नियुक्त केले आहेत. ३० विद्यार्थामागे एक पर्यवेक्षक या प्रमाणे रचना केली आहे.विद्यार्थ्यांशी वैयक्तिक संवाद, त्यांचे दैनंदिन निरीक्षण व मूल्यमापन केले जाते. विद्यार्थ्यांची वैयक्तिक स्वच्छता, त्यांचे आचार –विचार, शिस्तपालन आणि आहार याकडे लक्ष दिले जाते.

दिनचर्येनुसार अभ्यासाच्यावेळी विद्यार्थ्यांचा वर्गश: अभ्यास. घेतला जातो. स्वयंअध्ययनास प्राधान्य दिले जाते. पर्यवेक्षकांच्या उपस्थितीत अभ्यास घेतला जातो. अभ्यासासाठी स्वतंत्र अभ्यास कक्ष आहेत. सुलेखन व शुद्धलेखनासाठी विशेष वर्ग घेतले जातात.

सुरक्षेच्या दृष्टीने वसतिगृह व वसतिगृह परिसरात सी. सी. टी. व्ही. कॅमे-याद्वारे निगराणी ठेवली जाते. वसतिगृह गेटवर २४ तास सुरक्षा रक्षकांची उपस्थिती असते.

आठवड्यातून दोन दिवस तज्ञ डॉक्टरांची वसतिगृहास भेट असते. प्रथमोपचार करू शकणारे प्रशिक्षित प्रथमोपचार तज्ज्ञ पर्यवेक्षक दादा आहेत. वर्षातून दोन वेळा संपूर्ण आरोग्य तपासणी केली जाते. यावेळी वजन, उंची इ. आरोग्य विषयक बाबींची नोंद केली जाते. आणीबाणीच्या प्रसंगी अथवा रुग्णालयात जाण्यासाठी स्वतंत्र रुग्णवाहिकेची व्यवस्था आहे. आजारी मुलांसाठी वेगळा ४ कॉटचा रुग्णनिवास तयार केला आहे. आवश्यकते नुसार विद्यार्थ्यांना तज्ञ डॉ. मार्फत आरोग्य विषयक मार्गदर्शन केले जाते.

पालकांना आपल्या पाल्याशी बोलण्यासाठी आठवड्यातून एकदा ठरलेल्या दिवशी व ठरलेल्या वेळी दूरध्वनीद्वारे संपर्क साधता येतो.
मुलांच्या दैनंदिन गरजेच्या विविध वस्तू उपलब्ध करून देण्यासाठी स्वतंत्र विविध वस्तू भांडार सुविधा आहे. यात शालेय साहित्य तसेच साबण, पेस्ट तेल इ. वस्तू उपलब्ध करून दिल्या जातात.
ज्या मुलांना स्वतःचे कपडे धुण्यात अडचण आहे त्यांच्यासाठी स्वतंत्र परंतु सशुल्क धुलाई व्यवस्था केली जाते. या व्यवस्थेचा लाभ घेणे पालकांच्या इच्छेवर अवलंबून आहे.
मंगलमय ध्यान सभागृह.
पिण्याच्या पाण्यासाठी शुद्ध पेयजल यंत्राची व्यवस्था.
उन्हाळ्यात शीत पेयजल यंत्राची सुविधा.
दोन स्वतंत्र वीज जनित्राची सुविधा. (छोटे व मोठे)
ज्ञान व मनोरंजनासाठी एल.ई.डी. टी. व्ही. ची सुविधा.
स्वतंत्र केशकर्तनालयाची सुविधा.
प्रत्येक मजल्यावर सुसज्ज स्वच्छतागृह व आंघोळीसाठी गरम पाण्याची सोय.